माननीय,

आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की ABP माझा आणि Gyan-key वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त “अमृत महोत्सवी स्वतंत्र भारत” ही अभिनव स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्त “मागील ७५ वर्षे व पुढील २५ वर्षे” या विषयी अमृत महोत्सवी स्वतंत्र भारत या अभिनव स्पर्धेत भाग घेऊन आपले मत मांडावयाचे आहे.

आपल्याला या विषयीचे मत १० वाक्यांमधे लिहून स्वत:चे नाव, वय, पत्ता व संपर्क नंबरासहीत पोस्टाने प्रदीप लोखंडे पुणे-४११०१३ या पत्त्यावर व WhatsApp द्वारे 9765525544 / 9765512233 या नंबरवर १९ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवायचे आहे.

या स्पर्घेत सर्व वयोगटातील व्यक्ती भाग घेऊ शकतात. भाग घेणाऱ्यांमधुन ABPमाझा ने निवडलेल्या ३०० जणांना मुंबईमध्ये होणाऱ्या ABPमाझाच्या live कार्यक्रमासाठी निमंत्रित करून ट्रॅाफी व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच या live कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. ही माहिती आपल्या सर्व WhatsApp ग्रुपवर पाठवा ही नम्र विनंती.

चला तर मग आपण सर्वजण मोठ्या संख्येने “अमृत महोत्सवी स्वतंत्र भारत” या अभिनव स्पर्धेत भाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करूयात व फेब्रुवारी २०२३ ला ABPमाझा च्या live कार्यक्रमात सहभागी होऊयात.

आपली,
ABPमाझा व Gyan-key team